वयाच्या 56 व्या वर्षीही इतक्या देखण्या आहेत अर्चना जोगळेकर, परदेशात राहून करतायेत हे काम By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 07:34 PM 2021-03-01T19:34:37+5:30 2021-03-01T19:40:43+5:30
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच आज वाढदिवस आहे. 1 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या अर्चना जोगळेकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी-ओडिया चित्रपट आणि मालिकांतही काम केले आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले.
केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर अर्चना उच्चशिक्षीतही आहेत आणि त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे.
अर्चना जोगळेकर यांनी नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले.
अर्चना या सध्या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही.
अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात.
अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून 'श्रृंगार मनी' आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून 'नृत्य भारती' हा पुरस्कारही मिळाला आहे.
अर्चना जोगळेकर यांनी आतापर्यंत रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दानगी, बात है प्यार की, आग से खेलेंगे, स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
यासोबतच त्यांनी बोगामुल या तामिळ सिनेमात तर सुना चंदेई या ओडिशा चित्रपटात काम केले आहे.
अर्चना या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्या आजही नृत्याची आवड जोपासत आहेत.