bollywood-art-director-nitin-desais nd studios-inside photos
ND स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी संपवलं जीवन;पाहा 43 एकर जागेतील स्टुडिओचे Inside photo By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:51 AM2023-08-02T10:51:36+5:302023-08-02T10:57:51+5:30Join usJoin usNext ND studio: भारतातील पहिलं थीम पार्कदेखील या स्टुडिओमध्ये आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, या वृत्तामुळे सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत प्रत्येकालाच धक्का बसला आहे. कर्जतमध्ये असलेल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर या स्टुडीओचीही चर्चा रंगली आहे. मुंबईपासून ६५ किलोमीटर दूर असलेल्या कर्जतमध्ये नितीन देसाई यांचा भव्यदिव्य असा एनडी स्टुडिओ उभारलेला आहे. २००५ मध्ये हा स्टुडिओ उभारण्यात आला. जवळपास ४३ एकर अशा विस्तीर्ण जागेत हा स्टुडिओ मोठ्या थाटात उभा आहे. २३ वर्षांपासून या स्टुडिओमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांचं शुटिंग झालं आहे. या स्टुडिओमध्ये ऐतिहासिक किल्ले, शहरे, बाजार, हवेली, मंदिर आणि गाव असे अनेक लोकेशन्स आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात ऐश्वर्या राय तिच्या कुटुंबासोबत ज्या हवेलीत राहिली होती. ही हवेली या स्टुडिओतीलच एक सेटअप आहे. भारतातील पहिलं थीम पार्कदेखील या स्टुडिओमध्ये आहे. या स्टुडिओमध्ये १९८ पेक्षा जास्त सिनेमा, २०० मालिका आणि ३५० पेक्षा जास्त गेम शोचं चित्रीकरण झालं आहे.टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनकर्जतNitin Chandrakant DesaibollywoodCelebritycinemaTelevisionKarjat