marathi actor subodh bhave wedding album
नववधू प्रिया मी बावरते! सुबोध भावेच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:30 PM2021-09-29T17:30:00+5:302021-09-29T17:30:00+5:30Join usJoin usNext Subodh bhave: १९९१ मध्ये सुबोध आणि मंजिरी यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. (Photos : subodh bhave facebook page) आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आज त्याचा तुफान मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सुबोध त्याच्या करिअरसोबतच पर्सनल लाईफमुळेही तितकाच चर्चिला जातो. सुबोधची दोन्ही मुलं आणि पत्नी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. म्हणूनच, आज आपण सुबोध आणि मंजिरी यांच्या लग्नाचा अल्बम पाहुयात. १९९१ मध्ये सुबोध आणि मंजिरी यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मंजिरीच्या एका होकारासाठी सुबोधला बरीच वाट पाहावी लागली असं म्हणतात. सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर काही काळ गेल्यावर सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं. सुबोधने प्रपोज केल्यावर मंजिरीनेही तितक्याच हटके अंदाजात त्याला उत्तर दिलं. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं. "बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज..", असं मंजिरी त्यावेळी सुबोधला म्हणाली. विशेष म्हणजे तिने सांगितल्याप्रमाणे ती त्याच वेळी पुलावर सुबोधला भेटायलाही गेली. १९९१ मध्ये सुबोध आणि मंजिरीच्या सुरू झालेल्या प्रेमाच्या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २००१ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.टॅग्स :सुबोध भावे Subodh Bhave