एका सिनेमासाठी १० लाख घेणाऱ्या अमृताचं नेटवर्थ किती माहितीये? एकूण प्रॉपर्टी पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 14:33 IST2023-04-04T14:27:32+5:302023-04-04T14:33:20+5:30
Amruta khanvilkar: अमृता जाहिराती, ब्रँड एंडोर्सटमेंट यांच्या माध्यातूनही आर्थिक कमाई करते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्तम अभिनयाच्या जोरावर अमृताने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
वाजले की बारा या गाण्यामुळे अमृता तुफान लोकप्रिय झाली.
एक डान्सर म्हणून अमृताने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
अमृता मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एका सिनेमासाठी तब्बल १० लाख रुपये मानधन घेते.
अमृता जाहिराती, ब्रँड एंडोर्सटमेंट यांच्या माध्यातूनही आर्थिक कमाई करते.
मीडिया रिपोर्टनुसार, अमृताची एकूण संपत्ती तीस कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
अमृता अलिकडेच चंद्रमुखी या सिनेमात झळकली. यात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.
अमृताने मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.
राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमामध्ये तिने काम केलं आहे.