The beginning of the World Orange Festival in Nagpur
नागपुरात वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलला सुरुवात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 09:44 PM2017-12-17T21:44:12+5:302017-12-17T21:51:22+5:30Join usJoin usNext नागपुरातील २० महत्त्वाचे चौक व सार्वजनिक स्थळी या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. जे.जे. कला महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व ‘लोकमत’च्या पाठिंब्यातून सकारलेल्या या अद्भूत प्रतिकृतींवर नागपूरकर मोहित झाले आहेत. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये कृषी प्रदर्शन लावण्यात आले असून देश-विदेशातील स्टॉल्स लागलेले आहेत. मिझोरम शासनानेही येथे स्टॉल लावला आहे. त्यात खासी मंडरीन, पमेलो या दोन संत्र्याच्या तेथील प्रजातीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते. पुढील पाच वर्षात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ जगातील महत्त्वाचा उत्सव बनेल व जगभरातून येथे लोक येतील असा विश्वास विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. सर्वच मान्यवरांनी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. संत्र्याला वैश्विक ओळख निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘लोकमत’ने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गडकरी यांनीही या उपक्रमाची आवश्यकता होतीच, असे आवर्जून सांगितले. ‘या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनात एकूण ५० स्टॉल लागले आहेत. यात महाराष्ट्र, पंजाब, मिझोरम, आसाम, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी देशातील विविध राज्यांसह श्रीलंका, भुतान, इस्रायल, टर्की आदी देशातील स्टॉलही लागले आहेत.