च्युईंगम डे; कुणाचे भलतेच आवडते तर कुणाचे नाक वाकडे.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 09:42 AM 2020-09-30T09:42:01+5:30 2020-09-30T09:48:02+5:30
च्युईंगम हा पदार्थ खाणारे आणि न खाणारे अशा दोन गटात जगाची विभागणी होऊ शकेल. ज्यांना ते आवडते त्यांना फारच आवडते आणि ज्यांना ते आवडत नाही त्यांना च्युईंगम चघळणारा व्यक्तीही डोळ्यासमोर नको असतो.. अशा टोकाच्या लोकप्रियता व नापसंती लाभलेल्या च्युईंगमचा आज खास दिवस.. जाणून घेऊ या त्याबद्दलच्या काही मजेदार बाबी.. सिंगापूरमध्ये च्युईंग गम वापरण्यास वा बाळगण्यास प्रस्क्रिप्शन लागते. तसे नसल्यास सहा हजार डॉलर्सचा दंड भरावा लागतो...
कांदा कापताना च्युईंगम चघळल्याने डोळ्यातून पाणी येत नाही.. च्युईंग गम चघळत राहिल्यामुळे दर तासाला ११ कॅलरीज जळतात.
जगातले पहिले च्युईंगम स्वीडनमध्ये आढळले. ते ९ हजार वर्ष जुने होते.
अमेरिकेत दरवर्षी चळघल्या गेलेल्या चुईंग गमपासून जर सरळ काडी बनवली तर ती सातवेळेस चंद्रापर्यंत पोहचू शकेल व परतू शकेल इतकी लांब होईल किंवा किंवा त्यापासून पृथ्वीला १५० वेढे घालत येऊ शकतील.
च्युईंगम चघळून बनवलेला जगातला सर्वात मोठा फुगा हा १९९४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आला. तो त्याचा परिघ २३ इंचांचा होता.
जगात फक्त मनुष्य प्राणीच आहे जो च्युईंगम चळघतो. जर एखाद्या माकडाला च्युईंगम दिले तर ते काही मिनिटासाठी चघळेल व नंतर लगेच बाहेर काढून स्वत:च्या डोक्यावर चिटकवून देईल..
जपानी संशोधकांनी मूड गम्सचा शोध लावला आहे. हे मूड गम्स खाल्ल्यावर ते तुमच्या मूडनुसार रंग बदलतात. च्युईंग गमला सर्वात प्रथम ब्लिबर ब्लबर असे म्हटले जायचे..