Is that the hill station of Nagpur ...?
हे नागपूर की हिलस्टेशन एखादे...? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:01 AM2018-12-10T11:01:26+5:302018-12-10T11:05:27+5:30Join usJoin usNext उपराजधानीच्या वातावरणाचा शनिवारपासून नूरच पालटलाय. कधी आभाळ भरून येतं तर कधी पावसाचा शिडकावा. रविवारची सकाळ तर पावसाच्या सरींनीच उगवली. पुन्हा मात्र दिवसभर शहरावर धुक्याचीच चादर पसरली. सकाळी सुरू असलेला वातावणातील गारवा रात्रीपर्यंत कायम होता. त्या गारव्यात पुन्हा थंडी ‘मी’ म्हणत होती. रविवारची सुटी तशी नागपूरकरांसाठी मस्तपैकी बाहेर हुंदडण्याची असते. पण अनेकांनी बदलत्या वातावरणामुळे घरातच घालवली. हाती छत्री घेऊन ऊबदार कपड्यात सकाळचा ‘मॉर्निंग’ वॉक मात्र साºयांनीच नियमित केला. नागपूरचा फुटाळा परिसर असो की सेमिनरी हिल्स. या थंडावा देणाºया ठिकाणांसह ‘थंडी’चा माहोल काहीसा आगळावेगळाच होता. उद्याही अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलाय. सर्व फोटो- मुकेश कुकडे व विशाल महाकाळकरटॅग्स :सिव्हिल लाइनCivil line