लेट्स सेलिब्रेट व्हॅलेंटाईन वीक : आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:00 IST2019-02-06T20:38:42+5:302019-02-06T21:00:31+5:30

आयुष्याच्या कातर क्षणी अलवारवेळी नकळतपणे स्वप्नांचा एक संवाद सुरू असतो...ते असते प्रेम.

अलगद कुणासाठी आपलं विश्व बदलवू पाहतं. मनाच्या वेलींवर फुले उमलायला येतात.

प्रेमाच्या महतीची सारीच क्षितिजे आकाशालाही ठेंगणी भासू लागतात.

प्रेमाच्या या नववळणावर दिवस फुलायला लागतात. यातूनच फुलत जातो मनामनामधील संवाद.

प्रेमाच्या दिव्यस्वप्नांची कहाणी अशा नाजूक वेळी फुलते. प्रेमाचे फूल म्हणजे आयुष्याच्या वेलीवर फुललेला एक सुंदर साज. त्याला कसं जपायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

या हळव्या प्रीतीची बिजे अंकुरायला व्हॅलेंटाईन हे एक निमित्त आहे. प्रेमाच्या या डावात अगम्य स्वप्नांचे सोहळे सजविण्यासाठी तरुणाई आतूर आहे.

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होतेय. त्यातलाच आज ‘रोज डे’. आता रोज सातही दिवस आठवणींना सोबत करण्यासाठी नागपुरातील बाजारपेठ विविध गिफ्टस्नी फुलली आहे. -संजय लचुरिया