'घेऊन जा ऽऽ गे मारबत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 03:03 PM2019-08-31T15:03:53+5:302019-08-31T15:21:12+5:30

मारबत महोत्सव... रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली.

नागपुरात मारबत महोत्सव जो इंग्रजांविरोधातील प्रतिकात्मक क्रांतीचे द्योतक आहे.

येथील भोसले राजघराण्यातील एका वंशजाने राजद्रोह करत कपटी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून मारबत महोत्सव आकाराला आला.

मात्र, त्या काळात इंग्रजी राजवटीशी उघड उघड संघर्ष करणे शक्य नसल्याने, महाभारतातील श्रीकृष्ण व राक्षशिण पुतना मावशीच्या कथेशी सांगड घालत लोकसंग्रहातून संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी या महोत्सवाची योजना आखण्यात आली. तेव्हापासून सलग 140 वर्षे हा महोत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा होत आहे.

या महोत्सव हजारो लोकांच्या एकत्रिकरणातून ‘इडा पिडा टळो, माशि मोंगसे घेऊन जा गे मारबत’ असा जल्लोष केला जातो.

या दोन प्रमुख मारबतींसोबतच अन्य आठ मारबती या महोत्सवात सहभागी असतात.

या मारबत महोत्सवामध्येच देश आणि जगपातळीवर असणाऱ्या प्रमुख समस्यांना प्रतिकात्मक पद्धतीने घेऊन बडगेही सादर होत असतात.

यंदा या महोत्सवात 21 बडगे सहभागी होणार असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, काश्मीर प्रकरणातील कलम 370, महागाई, राष्ट्रीय स्तरावरील राजनेते आणि अन्य प्रश्नांवर हे बडगे सांकेतिकरीत्या भाष्य करत होते.

टॅग्स :नागपूरnagpur