छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 08:15 PM 2019-06-15T20:15:16+5:30 2019-06-15T20:37:25+5:30
राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना महापौर नंदा जिचकार, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, येसाजी कंक
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेच्या प्रतिमेसमोर आरती करताना महिला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात आरती करताना शिवप्रेमी.
शिवराज्याभिषेक सोहळ्यात अनेक चिमुकले अशी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभुषा करून आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ढोल ताशा पथकाने रंगत आणली.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आटोपल्यानंतर शिवप्रेमी युवक-युवतींनी ढोल-ताशांच्या निनादात भगवा ध्वज नाचवला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ५१ सुवासिनींच्या हस्ते आरती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध संघटना सहभागी झाल्या. यावेळी युवकांनी तलवारबाजीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून तलवार उंचावत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. (सर्व छायाचित्रे मुकेश कुकडे यांची)