जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारपासून (दि. ३) सुरू झालेली ही परिषद ७ जानेवारीपर्यंत चालणार असून यात रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील. या अधिवेशनातील काही खास क्षणचित्रे. (फोटो - विशाल महाकाळकर)