नागपुरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 22:47 IST2018-03-25T22:47:40+5:302018-03-25T22:47:40+5:30

नागपुरातील श्री पोद्दारेश्वर राममंदिराच्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार रविवारी भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली.(छायाचित्रं-संजय लचुरिया)
रथावर विराजमान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले.
महापौर नंदा जिचकार, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मूर्तींच्या पूजनाचा मान मिळाला.
त्यानंतर शहरातील नियोजित मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ झाली.
शोभायात्रेत वैविध्यपूर्ण चित्ररथ असून, हजारो भक्तांचा उत्साहपूर्ण सहभाग आहे.