विधानभवनात बत्ती गुल, जिकडे-तिकडे पाणीच पाणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 04:31 PM 2018-07-06T16:31:16+5:30 2018-07-06T16:53:36+5:30
नागपूर येथे अधिवेशनात कामकाजावेळी सभागृहातील बत्ती गूल झाल्याने विरोधी आमदारांनी मोबाईलच्या प्रकाशात सरकारचा निषेध नोंदवला.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बत्ती गूल झाल्यानंतर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात कार्यालयात चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने घोषणाबाजी करत विरोधकांनी अंधारातही आपला निषेध सुरुच ठेवला. मोबाईलमध्ये टॉर्च लावून सभागृहाच्या पायरीवर बॅनरबाजी केली.
विधानभवताना पावसामुळे आमदारांची वाताहत झाल्याचे पाहायला मिळाले. रिमझिम पावसामध्ये छत्रीचा आधार घेत आमदार अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
नागपूर विधानभवन परिसरात अधिवेशनकाळात नेत्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून येत आहे. मात्र, पावसापुढे सर्वांनीच गुडघे पाण्यात टाकल्याचेही दिसते.
सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे नागपूर विधानभवन परिसरात तळे साचले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दिसून येते आहे.
ऐन अधिवेशनकाळात विधान भवन परिसरात पाणीच-पाणी झाली आहे. त्यामुळे या पाण्यापासून कशी सुटका करावी, असाच विचार येथील नेते, कार्यकर्ते आणि कर्मचारी करत असतील यात शंका नाही.
नागपूर येथील अधिवेशनात पत्रकारांनाही बातम्यांसाठी कसरत करावी लागली. हातात माईक घेऊन पाण्यातून मार्ग काढताना माध्यमांचे प्रतिनिधी या छायाचित्रात दिसत आहेत.