ओखी वादळामुळे नंदुरबार मधील जनजीवन विस्कळीत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:10 PM 2017-12-06T14:10:13+5:30 2017-12-06T14:23:28+5:30
दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने शहरातील शाळा सुटल्यानंतर घराकडे परतणाºया विद्यार्थिनींना छत्र्यांचा आधार घ्यावा लागला़
मंगळबाजारात आठवडे बाजारानिमित्त भाजी विक्रीसाठी आलेल्या महिला छत्र्या लावून ग्राहकांच्या प्रतीक्षेत होत्या़
सारंगखेडा ता़ शहादा येथे सुरू झालेल्या एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवावर पावसामुळे परिणाम झाला़ दिवसभर पाऊस असल्याने विक्रेते सामानावर प्लास्टिक टाकून बसून होते़
नंदुरबारमध्ये दिवसभर रिपरिप पाऊस सुरु असल्याने दुचाकीस्वारांची कसरत होत होती.
चेतक फेस्टीवल सुरू असलेल्या मैैदानात पाणी साचल्याने घोड्यांच्या कसरती, शर्यती आणि विविध स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या़
सारंगखेडा यात्रोत्सवात पावसामुळे घोड्यांच्या खरेदीसाठी वर्दळ कमी होती. यात्रेत दुसाने ता़ साक्री येथील रोहित भदाणे यांच्याकडून चंद्रजीत शिसोदे यांनी तीन लाखांचा घोडा खरेदी केला.