शत्रू राष्ट्राच्याही उरात धडकी भरवणारा तोफांचा 'प्रहार’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:38 PM2019-02-12T22:38:08+5:302019-02-12T22:43:11+5:30

नाशकातल्या देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वार्षिक ‘तोपची’ हे युद्धजन्य प्रात्याक्षिक करण्यात आले. (सर्व छायाचित्र- राजू ठाकरे)

यानिमित्ताने भारतीय सैन्यदलाच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या गोळीबार मैदानावर मोर्टारपासून थेट के-९वज्रपर्यंत सर्वच तोफा मोठ्या ताकदीने मंगळवारी धडाडल्या.

युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याच्या आधुनिक वाटचालीची गतिमानता बघून शत्रू राष्ट्राच्याही उरात धडकी भरेल.

अचूक लक्ष्यभेद, काही सेकंदात एकापेक्षा अधिक बॉम्ब डागण्याची क्षमता असलेल्या 1300 एमएम, 105 एम. एम, उखळी मारा करणारी हलकी तोफ आहेत.

तसेच कारगिल युद्धात शत्रूला सळो की पळो करून सोडणारी 155 एम. एम. बोफोर्स, 130 एम. एम. सोल्टम, होवित्झर एम-777 आणि के-9 वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने प्रशिक्षित जवानांनी दिलेले लक्ष्य निर्धारित मिनिटांत अचूकपणे भेदत तोफखान्याची ताकद दाखवून दिली.

होवित्झरने डागलेले पाच बॉम्ब आणि वज्रकडून तितक्याच ताकदीने झालेला बॉम्बहल्ला शत्रूला निश्चित धडकी भरविणारा असाच होता.

कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारण्यास यशस्वी ठरलेल्या बोफोर्स प्रकारच्या सहा तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्ब डागून लक्ष्य उद्ध्वस्त केले.