Climate change behind weather’s extreme mood swings in nashik
पर्जन्यराजा मनसोक्त बरसला अन् सगळीकडे हर्षोल्हास झाला By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 09:07 PM2019-07-09T21:07:10+5:302019-07-09T21:17:00+5:30Join usJoin usNext नाशिक शहरासह जिल्ह्यात पर्जन्यराजाच्या मनसोक्त वर्षावाची मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे) सलग दोन ते तीन दिवस जोरदार संततधारेचा वर्षाव झाल्याने सगळीकडे हिरवाई नजरेस पडत असून धरणांच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. बळीराजा आनंदी झाला असून पीकपाणीच्या उत्पादनासाठी त्याने कंबर कसली आहे. काळ्या मातीत भाताच्या आवणीला जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वेग आला आहे. गंगापूर धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली असून धरण 38 टक्के इतके भरले आहे. गोदाकाठावरील मंदिरे जणू न्हाऊन निघाली असून, त्यांचे रूपडे अधिक खुलल्याचे दिसत आहे. सगळीकडे लावणी करतानाचा चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकत बऱ्याच ठिकाणी लावणी सुरू झाली असून, शेतात बायका राबताना दिसत आहेत. टॅग्स :नाशिकNashik