नाशकात तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्यात चित्तथरारक कसरती By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 07:23 PM 2019-12-12T19:23:11+5:30 2019-12-12T20:08:30+5:30
नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त जवानांनी संचलन केलं. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे )
केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला.
भारतीय तोफखान्याच्या 304 जवानांनी (गनर) सशस्त्र संचलन करत डोळ्यांची पारणे फेडली.
रशियानिर्मित 122 एम. एम. होवित्सर डी-30, स्वीडन निर्मित 155 एम.एम.एफ.एच.-77 बोफोर्स, रशिया निर्मित 130 एम.एम.एम.-46, रशियानिर्मित 122 एम. एम. मल्टिबॅरल रॉकेट लॉन्चर या तोफांसह प्रमुख धर्मग्रंथांच्या साक्षीने विविध धर्मगुरूंनी उपस्थित नवसैनिकांना देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची शपथ दिली.
नवसैनिकांचा मुख्य शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर तोफखान्याच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून 304 नवसैनिकांच्या माता-पित्यांना मोठ्या सन्मानाने ‘गौरव पदक’ प्रदान करण्यात आले.
‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा और मैं अपने कर्तव्य के अनुसार इमानदारी और सच्चे मन से देशसेवा करुंगा...’ अशी शपथ जवानांनी घेतली.