heavy rain godavari river overflow nashik
नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 05:11 PM2019-07-07T17:11:59+5:302019-07-07T17:25:42+5:30Join usJoin usNext नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून कुठल्याहीप्रकारे विसर्ग करण्यात आलेला नसला तरीदेखील गोदापात्रातील दुतोंड्या मारूतीची मुर्ती गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडाली असून गोदापात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई येथील वेधशाळेकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गरज भासल्यास नाशिककरांनी घराबाहेर पडावे. नदीपात्रालगत जाऊ नये. नदीकाठावरील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून केले जात आहे. नाशिकमध्ये आज दिवसभर जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पावसाची संततधार सुरू आहे. वालदेवी नदीला पूर आला आहे. शनिवारी रात्री नऊ वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. रविवारी पहाटे साडेपाच वाजेपासून सकाळी साडे आठवाजेपर्यंत शहरात 32.8मि.मीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 70.5 मिमी पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान केंद्राने दिली. मागील 24 तासांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची नवीन आवक सुरू. धरणसाठा 15.22 टक्के. पहाटे 6 वाजेपर्यंत गंगापूर क्षेत्रात 96 मिमी. पाऊस पिंपळगाव बहुला येथील नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पुल पावसाच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. टॅग्स :गोदावरीनदीनाशिकपाऊसgodavaririverNashikRain