navratri celebration 2019 in nashik
नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात विविध रंगांची उधळण By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 11:18 AM2019-10-06T11:18:42+5:302019-10-06T11:32:53+5:30Join usJoin usNext नवरात्रोत्सव अर्थात देवीचा उत्सव... ‘बोलो अंबे माता की जय..’चा जयघोष करत नाशिक शहरात सर्वत्र नवरात्रोत्सव रंगात आला आहे. (फोटो - प्रशांत खरोटे, नाशिक) नाशिकच्या सप्तश्रृंगी गडापासून थेट शहरातील कालिका माता मंदिरापर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. कालिका देवी मंदीर, भगूरचे रेणूका देवी मंदिर परिसरात यात्रोत्सव बहरला आहे. नवरात्रोत्सवात शहरातील विविध लॉन्स्मध्ये दांडिया व गरबानृत्याचा तरूणाई मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहे. पारंपरिक पोशाखात तरूण-तरूणी गरब्यासाठी हजेरी लावून थिरकताना दिसून येत आहे. नाशिकच्या गोदाकाठावरील सांडव्यावरील देवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक पोशाखात गोंधळ येते पाहायला मिळत आहे. नाशिकच्या बंगाली बांधवांच्या वतीने बंगा संजोग फाऊंडेशनच्या वतीने दुर्गा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहात गंगापूररोडवर साजरा केला जात आहे. या ठिकाणी दूर्गामातेच्या भव्य मूर्तीचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.टॅग्स :नवरात्रीनाशिकNavratriNashik