president ramnath kovind in nashik for combat army aviation training school Program
‘कॅट्स’ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बहाल केला ‘प्रेसिडेंट कलर’ By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:47 PM2019-10-10T16:47:45+5:302019-10-10T16:52:18+5:30Join usJoin usNext नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला (कॅट्स) गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी थाटात दिमाखदार सोहळ्यात प्रेसिडेंट कलरचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. (सर्व छायाचित्रे - राजू ठाकरे) राष्ट्रपती रामनाथ कोविंद सलामी मंचावर येताच कॅट्सच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीने राष्ट्रगीताच्या धूनवर त्यांना ‘सॅल्यूट’ केला. कॅट्सच्या बँड पथकाने आपल्या खास शैलीत धून वाजवित संचलन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी अधिकाऱ्यांसमवेत ‘जिप्सी’मधून संपूर्ण परेड मैदानाचे निरिक्षण केले. रामनाथ कोविंद यांनी उपस्थित वैमानिकांना आपल्या भाषणातून महत्त्वपूर्ण संदेश दिला. सोहळ्यानंतर उपस्थित सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आठवण सेल्फीमध्ये टिपली. प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना दिली. वैमानिकांनी रूद्र, ध्रूव, चित्ता, चेतक या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई कसरती सादर केल्या. टॅग्स :रामनाथ कोविंदनाशिकRamnath KovindNashik