सोनई येथील तिहेरी हत्याकांड खटल्याचा युक्तिवाद पूर्ण, शनिवारी सुनावणार शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:34 IST2018-01-18T17:26:12+5:302018-01-18T17:34:03+5:30

राज्यात गाजलेल्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला.

सुनावणीसाठी आरोपींना कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. अखेप न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत येत्या शनिवारी (दि.२०) या खटल्यामधील दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचे जाहीर केले.

सुनावणीसाठी न्यायालयाच्या आवारात खूप गर्दी झाली होती.

संवेदनशील खटला असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.