A trolley of Mumbai-Gorakhpur Antyodaya Express derails near Nashik, no injuries
...अन् थोडक्यात बचावले हजारो रेल्वे प्रवाशांचे प्राण By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:01 PM2019-07-18T13:01:55+5:302019-07-18T13:06:28+5:30Join usJoin usNext मुंबई नाशिक रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे ३:३० वाजता प्रवासी साखर झोपेत असताना मुबंईहून गोरखपुरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे नाशिककडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कसारा घाट माथ्याच्या वळणावर भीमा 2 पुलावर या गाडीच्या एका डब्याचे रुळावर चाक घसरल्याने मोठी दुर्घटना टळली. मोठा अपघात झाला असता तर जवळपास 100 ते 150 फूट खोल डबे खाली पडले असते. जर पुलावरून डबा खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. काही तासानंतर रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन पाठविण्यात आली. या अपघातामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटरेल्वेMumbai Train Updaterailway