नाशिकात वारक-यांची मांदियाळी !,

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 10:05 PM2018-01-12T22:05:42+5:302018-01-12T22:09:12+5:30

श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवनिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथील रिंगण सोहळ्यात निवृत्तीनाथांच्या नामघोषात तल्लीन झालेला वारकरी.

श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवनिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे भरलेला भाविकांचा रिंगण सोडळा

श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवातील रिंगण सोहळ्यात विठ्ठलनामचा गजर करीत भक्तीरसात तल्लीन झालेला वारकरी

शुक्रवारी निवृत्तिनाथ महाराज यात्रा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून भाविकांचे लोंढे त्र्यंबकला दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर खास यात्रा बघण्यासाठी विदेशातूनदेखील हल्ली पर्यटक आले आहेत.

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय.. निवृत्तिनाथ महाराज की जय..! असा जयघोष जागोजागी ऐकायला येतो आहे. बस, ट्रॅक्टर, ट्रक व पायी दिंड्यांमधून निवृत्तिनाथ महाराजांचा जय जयकार सुरू आहे. मुखी फक्त हरिनाम व निवृत्तिरायाचा गजर सुरू आहे.