१ रुपये सॅलरी, पत्नी पायलट..! मोदींसमोर काळा चष्मा घातलेले IAS अधिकारी पुन्हा चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:12 PM 2024-09-04T16:12:05+5:30 2024-09-04T16:16:11+5:30
बहुचर्चित आयएएस अधिकारी अमित कटारिया हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कटारिया परत छत्तीसगडमध्ये रुजू झालेत. ते सध्या केंद्रीय नियुक्तीवर होते अद्याप त्यांना कुठलाही विभाग मिळाला नाही. अमित कटारिया छत्तीसगडमधील चर्चेत असणारे IAS अधिकारी आहेत.
रमनसिंह सरकारच्या कार्यकाळात काळा चष्मा घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गेल्याने अमित कटारिया चर्चेत होते. त्यांच्या कारकिर्दीतील हा मोठा वाद होता. त्यावरून प्रशासनाने अधिकारी अमित कटारिया यांना नोटीस बजावली होती.
सुरुवातीच्या काळात अमित कटारिया हे केवळ १ रुपये सॅलरी घेत होते. अमित कटारिया हे एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातून येतात. छत्तीसगडमध्ये चर्चेत असणारे हे अधिकारी तब्बल ७ वर्षांनी पुन्हा राज्यात परतले आहेत.
कटारिया यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परतत मंत्रालयात ड्युटी ज्वाईन केली आहे. २००४ च्या बॅचचे अधिकारी अमित कटारिया यांच्या काळात बऱ्याचदा बातम्यांमध्ये झळकत होते. कटारिया यांनी रायपूर आणि बस्तर येथे महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. २०१७ पासून ते केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर होते.
अमित कटारिया मूळचे गुडगावचे आहेत. ते उद्योगपती घराण्यातून पुढे आलेत. बस्तरमध्ये जिल्हाधिकारी असताना कटारिया त्यावेळी चर्चेत आले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवेळी ते काळा चष्मा घालून आले होते. ही घटना २०१५ रोजीची होती जेव्हा मोदींचा दौरा होता. त्यावेळी रमन सिंह राज्याचे मुख्यमंत्री होते.
एअरपोर्टवर स्वागत करताना कटारिया निळा शर्ट आणि काळा चष्मा घालून आले होते. राज्य सरकारने सेवा नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. या प्रकारावर मुख्यमंत्री रमन सिंह यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
छत्तीसगडमध्ये कटारिया यांच्या वादाची मोठी यादी आहे. २०११ मध्ये जेव्हा ते रायगडचे जिल्हाधिकारी होते तेव्हा भाजपा नेते रोशनलाल अग्रवाल यांना त्यांनी ऑफिसमधून बाहेर हाकलले होते. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आले होते.
आयएएस अधिकारी अमित कटारिया हे आयआयटी दिल्लीतून इंजिनिअरींगचे पदवीधर आहेत. कटारिया यांना लाखो रुपयांच्या ऑफर कंपन्यांकडून मिळाले होते. परंतु आयएएस अधिकारी बनवण्याचं त्यांचे स्वप्न होते. कटारिया कुटुंब दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करते.
आयएएस अधिकारी अमित कटारिया यांची पत्नी प्रोफेशनल पायलट आहे. तिचं नाव स्मिता असून अमित कटारिया पत्नीसोबचचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अमित कटारिया अशा ५ अधिकाऱ्यांपैकी आहेत जे प्रतिनियुक्तीनंतर छत्तीसगडमध्ये परतले आहेत.
अमित कटारिया यांचा बेसिक पगार ५६ हजार असून इतर भत्त्यासह हा पगार २०२१ च्या रेकॉर्डनुसार १ लाख ४७ हजार इतका आहे. परंतु ते केवळ १ रुपये पगार म्हणून घेतात. जेव्हा त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणतात की, देशाची सेवा करण्यासाठी मी अधिकारी झालोय. माझ्यामुळे देशाचे काही हित असेल तर त्यापेक्षा मला काही मोठे नाही.