11 Most Expensive Houses In India That Could Represent The GDP Of Some Countries, see pic
Photo : भारतातील ११ सर्वात महागडी घरं; किंमत एवढी की काही देशांचा GDP ही नसेल इतका! By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:29 PM2021-05-26T17:29:09+5:302021-05-26T17:35:06+5:30Join usJoin usNext अँटिलिया - १२,००० कोटी ( Antilia - 12,000 Crores ) शिकागो येथील आर्किटेक्ट्स परकिन्स अँड विल, यांनी या बंगल्याचे डिझाईन तयार केले. भारतातील हे सर्वात महागडं घर आहे आणि जगातील दुसरं... भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच हे घर. २७ मजली इमारतीत सर्व लक्झरीस सोईसुविधा आहेत आणि ८० जणांना पाहता येईल असं थिएटरही आहे. याशिवाय सलून, आईस क्रिम पार्लर, स्वीमिंग पूल, जिम आदी सर्व त्यात आहे. फोर्ब्सच्या वृत्तानुसार अँटिलियाची किंमत ६ ते १२ हजार कोटींच्या घरात आहे.जेके हाऊस - ६००० कोटी ( JK House - 6000 crores ) रेयमंड ग्रूप चेअरमन गौतम संघानिया ( Raymond Group chairman Gautam Sanghania) याचं घर हे भारतातील दुसरे महागडे व सर्वात उंचा खाजगी घर आहे. १६ हजार स्क्वेअर फिटवर ३० मजली हे जेके हाऊस आहे त्यात ६ मजले हे फक्त गाड्यांच्या पार्किंगसाठी आहेत. अॅबोड - ५००० कोटी ( Abode - 5000 crores ) अनिल अंबानीचं हे घर १६००० स्क्वेअर फिटवर आहे. हे देशातील तिसरे सर्वात महागडे घर आहे. जटिया - ४२५ कोटी ( Jatia House - 425 crores ) Burma Teakwoodचे मालक के एम बिर्ला ( KM Birla) यांचे हे २० बेडरुम्सचं घर आहे.मन्नत - २०० कोटी ( Mannat - 200 crores) बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचं घर या यादित पाचव्या क्रमांकावर येतं. जिंदाल हाऊस ( दिल्ली) - १५० कोटी ( Jindal House - 150 crores) राजकारणी व उद्योगपती नवीन जिंदाल यांचं दिल्ली येथील Leafy Lutyens Bungalow Zone येथील बंगला ३ एकर जागेवर उभा आहे. रतन टाटा रिटायर्मेंट होम - १५० कोटी ( Ratan Tata ‘s Retirement home - 150 crores ) मुंबईतील कुलाबा येथे १३,३५० स्क्वेअर फिटच्या या घराची किंमत १५० कोटी आहे. रुईया हाऊस - १२० कोटी ( Ruia House - 120 crores ) Essar Group चे रुईया ब्रदर्स यांचे दिल्लीतील हे सुंदर घर. त्याची किंमत १२० कोटी आहे, राणा कपूर रेसिडेन्स ( Rana Kapoor Residence - 120 crores ) येस बँकचे CEO राणा कपूर यांचे मुंबईत हे १२० कोटींचं घर आहे. जल्सा - १२० कोटी ( Jalsa - 120 Crores) सत्ते पे सत्ता या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी हे घर गिफ्ट म्हणून दिले होते. स्काय हाऊस ( Sky House - 100 crores) किंगफिशनचे मालक विजय माल्ल्या यांचे बंगळुरू येथील १०० कोटींचे घर. टॅग्स :मुकेश अंबानीअनिल अंबानीरतन टाटाविजय मल्ल्याअमिताभ बच्चनशाहरुख खानMukesh AmbaniAnil AmbaniRatan TataVijay MallyaAmitabh BachchanShahrukh Khan