14 yr old winner of KBC ravi saini now becomes Porbandar SP kkg
अभिमानास्पद! वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 07:08 PM2020-05-28T19:08:56+5:302020-05-28T19:21:05+5:30Join usJoin usNext १९ वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपती ज्युनियरमध्ये १ कोटी रुपये जिंकणाऱ्या रवी मोहन सैनी यांनी पोरबंदरचे पोलीस अधीक्षक म्हणून सुत्रं हाती घेतली. वयाच्या १४ व्या वर्षी केबीसीमध्ये १ कोटी जिंकणाऱ्या रवी सैनी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. केबीसीमध्ये १ कोटी जिंकले त्यावेळी रवी १४ वर्षांचे होते. त्या वयात त्यांना मिळालेलं यश नेत्रदीपक होतं. केबीसीमुळे रवी सैनी यांना प्रसिद्ध मिळाली. मात्र त्या प्रसिद्धीची हवा रवी यांच्या डोक्यात गेली नाही. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेल्या सैनी यांचे वडील नौदलात अधिकारी होते. त्यामुळे रवी यांचं शिक्षण आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमधील नौदलाच्या शाळेत झालं. दहावीत असताना रवी सैनी यांनी केबीसीमध्ये भाग घेतला होता. १५ प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्यांनी १ कोटी जिंकले. केबीसीमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा रवी सैनी यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. वडिलांप्रमाणे त्यांनाही गणवेशानं भुरळ घातली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलं. एमबीबीएसनंतर इंटर्नशिप करत असताना ते यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. २०१४ च्या गुजरात केडरचे अधिकारी असलेले रवी सैनी सर्वप्रथम राजकोट शहराच्या झोन एकचे उपायुक्त म्हणून काम केलं. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्याकडे पोरबंदरच्या अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. कोरोना संकटात शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याला आपलं प्राधान्य असेल, असं सैनी यांनी सांगितलं.