5 major changes since October 1; Vendors will no longer be able to sell expired sweets
१ ऑक्टोबरपासून ५ मोठे बदल; आता विक्रेत्यांना मुदत संपलेली मिठाई विकता येणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 03:52 PM2020-09-30T15:52:11+5:302020-09-30T16:01:10+5:30Join usJoin usNext एक ऑक्टोबरपासून आरोग्य विम्यात मोठे बदल होणार आहेत. आयआरडीएच्या नियमांनुसार, जर विमाधारकाने आपल्या विमा पॉलिसीचा प्रीमियम सलग 8 वर्षे भरला असेल तर कंपनी कोणत्याही कमतरतेच्या आधारे क्लेम रिजेक्ट करु शकत नाही. या व्यतिरिक्त पॉलिसीच्या कक्षेत जास्त आजारांचा समावेश असेल. मात्र, जास्त आजार कव्हर केल्यामुळे प्रीमियम महाग होऊ शकतो. एक ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून बाजारात विकल्या जाणाच्या खुल्या मिठाईची एक्स्पायरी डेट द्यावी लागणार आहे. म्हणजेच व्यापाऱ्यांना मिठाई किती दिवस टिकते, याची तारीख आता ग्राहकांना द्यावी लागणार आहे. अन्न नियामक एफएसएसएआयने हे अनिवार्य केले आहे. प्राप्तिकर विभागाने सोर्सवर कर वसुली (टीसीएस) तरतुदीच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. यामध्ये ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी आवश्यक आदेश आहे. त्यानुसार एक ऑक्टोबरपासून ई-कॉमर्स ऑपरेटरला डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तू किंवा सेवांच्या एकूण मूल्यावर एक टक्के दराने आयकर भरावा लागेल. येत्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये बदल होऊ शकतो. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट ते सप्टेंबर या तिमाहीत व्याज दर स्थिर ठेवण्यात आले होते. दरम्यान, छोट्या बचत योजनेच्या व्याज दराचा दर तीन महिन्यांनी सरकारकडून आढावा घेतला जातो. सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणार्या मोहरीच्या तेलात इतर कोणत्याही खाद्यतेलांचे मिश्रण करण्यास एक ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न नियामक एफएसएसएआयने एक आदेश जारी केला आहे. 'भारतातील इतर कोणत्याही खाद्यतेलमध्ये मोहरीच्या तेलाचे मिश्रण 1 ऑक्टोबर 2020 पासून पूर्णपणे थांबविले जाईल', असे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.Read in Englishटॅग्स :करआरोग्यTaxHealth