7 years ... every Diwali of Narendra Modi since he became the Prime Minister with the indian army
7 साल... पंतप्रधान बनल्यापासून नरेंद्र मोदींची प्रत्येक दिवाळी सैन्यांसोबतच By महेश गलांडे | Published: November 14, 2020 03:54 PM2020-11-14T15:54:43+5:302020-11-14T16:30:21+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जसलमेरला पोहोचले. नरेंद्र मोदींनी जसलमेरला पोहोचल्यानंतर अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधला. भारताला आव्हान दिलं गेलं, तर जोरदार प्रत्युत्तर मिळेल. काही जण अजूनही विस्तारवादी मानसिकतेत अडकले आहेत. १८ व्या शतकातील ही मानसिकता म्हणजे एक मानसिक आजार असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. जसलमेरमधल्या लोंगेवाला पोस्टवर पोहोचलेल्या मोदींनी जवानांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी सन 2014 मध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, 2014 साली सियाचीन येथे आपली दिवाळी साजरी केली होती. यंदा कोरोनामुळे दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी होत आहे. देशात कोरोना रोगाच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र साधेपणाने दिवाळी साजरी केली जात आहे. अशावेळी सीमेवर राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं. दरम्यान पंतप्रधानांनी ट्विट करुन देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सीमेवरील जवानांच्या नावाने एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळच्या राजौरी जिल्ह्यात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्याअगोदर त्यांनी उत्तराखंड आणि इतर ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी केली होती. यंदा मोदी जैसलमेरमध्ये जाऊन ते दिवाळी साजरी करत आहेत. मोदींनी 2014 मध्ये सियाचीन, 2015 मध्ये अमृतसर, 2016 मध्ये लाहौल स्पिटी, 2017 मध्ये गरेझ, 2018 मध्ये चामोली, 2019 मध्ये राजौरी आणि यंदा 2020 मध्ये जैसलमेर येथे जाऊन दिवाळी साजरी केली. दरवर्षी सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत, मोदींनी जवानांच्या पाठिशी देश उभा असल्याचा मेसेज देतात. त्यामुळे, जवानांचे मनोबल वाढते. अभिनेता अनुपर खेर यांनी आपल्या ट्विटर अकांटवरुन मोदींच्या गेल्या 7 वर्षातील दिवाळीबद्दल सांगितलं आहे, तसेच मोदींचे आभारही मानले आहेत टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय जवानदिवाळीपंतप्रधानNarendra ModiIndian ArmyDiwaliprime minister