7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील महिन्यात खात्यावर जमा होणार 2,18,200 रुपये, जाणून घ्या कसे? By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:55 PM 2021-06-21T19:55:42+5:30 2021-06-21T20:12:05+5:30
कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा एरिअर देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच एरिअरसोबत डीए देण्यात येईल. ही घोषणा 7व्या वेतन आयोगांतर्गत केली जाईल. (7th pay commission central govt employee) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employee) आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) 26 जूनला डीए संदर्भात बैठक घेणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या डीए (DA Hike) संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. (7th pay commission central govt employee may get 18 months arrear in his account)
सरकारकडून कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2020 पासून ते 1 जानेवारी 2021 पर्यंत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातील. याशिवाय जून 2021 च्या डीएचीही घोषणा होऊ शकते.
कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा एरिअर देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच एरिअरसोबत डीए देण्यात येईल. ही घोषणा 7व्या वेतन आयोगांतर्गत केली जाईल.
डीएसंदर्भातील ही बैठक 26 जून 2021 रोजी होईल. नॅशनल काउंसिल ऑफ JCM, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि अर्थ मंत्रालय यांच्यात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगांतर्गत DAची मोठी थकबाकी मिळेल.
2 लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम जमा होणार - नॅशनल काउंसिल ऑफ जेसीएमच्या शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेव्हल 1 मधील कर्मचार्यांचा डी.ए. एरिअर 11,880 रुपयांपासून ते 37,554 रुपयांपर्यंत होतो. तर, लेव्हल-13 च्या कर्मचाऱ्यांना 7th CPC बेसिक पे-स्केल 1,23,100 रुपयांपासून 2,15,900 रुपये अथवा लेव्हल-14 (पे-स्केल) साठी कॅलक्युलेशन केल्यास एका कर्मचाऱ्याच्या हातात DA एरिअरचे 1,44,200 रुपयांपासून ते 2,18,200 रुपये येतील.
असे होईल DA चे कॅलक्यूलेशन - DA च्या कॅलक्यूलेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास ज्यांचा किमान ग्रेड पे 1800 रुपये (लेव्हल-1 बेसिक पे स्केल रेन्ज 18000 ते 56900) असेल त्यांना 4320 रुपये [{18000 च्या 4 टक्के} X 6] येतील. तसेच [{ 56900 का 4 फीसदी}X6] असलेल्यांना 13656 रुपये मिळतील.
7व्या वेतन आयोगांतर्गत मिनिमम ग्रेड पेवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत DA एरिअर 3,240 रुपये [{18,000 रुपयांचे 3 टक्के}x6] मिळेल. तर, [{56,9003 रुपयांचे 3 टक्के}x6] असलेल्यांना 10,242 रुपये मिळेल. याच प्रमाणे...
...जानेवारी महिन्यापासून ते जुलै 2021 दरम्यान DA एरिअरचा विचार केल्यास 4,320 [{ 18,000 रुपयांचे 4 टक्के}x6] मिळतील. तर, [{₹56,900 रुपयांचे 4 टक्के}x6] चे 13,656 रुपये मिळतील.
महागाई भत्ताही सामील होण्याची आशा - ज्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18000 रुपये आहे, त्यांना डीए एरिअरच्या स्वरुपात 11,880 रुपये (4320+3240+4320) मिळतील. याशिवाय यात 15 टक्के महागाई भत्ता जोडला जाण्याचीही आशा आहे. असे झाल्यास आपल्या पगारात महिन्याला 2700 रुपयांची वाढ होईल.
18 महिन्यांनंतर होईल वाढ - कर्मचाऱ्यांच्या डीऐमध्ये जवळपास 18 महिन्यांनंतर वाढ होईल. गेल्या वर्षी देशभरात पसरलेल्या कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचे डीए फ्रीज करून ठेवण्यात आले होते.
जानेवारी 2020 मध्ये डीएत 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. यानंतर, दुसऱ्या सहामाहित म्हणजेच जून 2020 मध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली होती. आता जानेवारी 2021 मध्ये तो 4 टक्क्यांनी वाढला आहे.