अवकाशातून भारताच्या दिशेने येतंय ५०० अणुबॉम्बएवढी ताकद असलेलं संकट, नासाने दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:23 IST2025-02-17T17:20:08+5:302025-02-17T17:23:50+5:30
Asteroid 2024 YR4: अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने लघुग्रह, अशनी, उल्का आदी वस्तू नेहमी येत असतात. दरम्यान, पृथ्वीच्या दिशेने सुमारे ६० हजार किमीच्या वेगाने येत असलेल्या एका लघुग्रहाने जगभरातील शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. हा लघुग्रह हा एवढा शक्तिशाली आहे की, ज्याच्या धडकेमुळे एका मोठ्या शहराचा विध्वंस होऊ शकतो. या लघुग्रहाचं नामकरण २०२४ वायआर४ असं करण्यात आलं आहे.

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने लघुग्रह, अशनी, उल्का आदी वस्तू नेहमी येत असतात. दरम्यान, पृथ्वीच्या दिशेने सुमारे ६० हजार किमीच्या वेगाने येत असलेल्या एका लघुग्रहाने जगभरातील शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. हा लघुग्रह हा एवढा शक्तिशाली आहे की, ज्याच्या धडकेमुळे एका मोठ्या शहराचा विध्वंस होऊ शकतो. या लघुग्रहाचं नामकरण २०२४ वायआर४ असं करण्यात आलं आहे.
दरम्यान, पृथ्वीच्या दिशेने येत असलेला हा लघुग्रह कुठे कोसळू शकतो. याबाबतचा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी बांधला आहे. नासाकडून प्रायोजित संस्था असलेल्या कॅटलिना स्काय सर्व्हे प्रोजेक्टचे इंजिनियर डेव्हिड रेंकिंन यांनी या लघुग्रहाच्या सध्याच्या स्थितीवरून त्याच्यामुळे धोका असलेल्या पृथ्वीवरील ठिकाणांचा एक संभाव्य नकाशा तयार केला आहे, त्यातून भारतालाही धोकाच्या इशारा देण्यात आला आहे.
२०२४ वायआर४ हा लघुग्रह २०३२ मध्ये पृथ्वीवर घडकण्याची शक्यता आहे. २०२४ वायआर४ हा लघुग्रह २०३२ मध्ये पृथ्वीवर धडकला तर तो दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागापासून ते पॅसिफिक महासागर , दक्षिणेतील सहारा भाग आणि आशिया खंडाचा काही भाग या भागात कुठेही आदळू शकतो. चिंतेची बाब म्हणजे या मार्गात भारतातील चेन्नई आणि चीनमधील हाईनान बेटासह घनदाट लोकसंख्येचा भाग आहे.
हा लघुग्रह २२ डिसेंबर २०३२ रोजी पृथ्वीवर आदळू शकतो. सद्यस्थितीत नासाच्या अंदाजानुसा हा उपग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ४८ मध्ये १ एवढी आहे. या लघुग्रहाचा व्यास ९० मीटर आहे. तो अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीएवढा आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर ज्या ठिकाणी आदळण्याची शक्यता आहे, त्या मार्गात बहुतांश भागात समुद्र आहे. मात्र जर हा लघुग्रह मानवी वस्तीच्या भागात कोसळला तर मात्र मोठा विध्वंस होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते २०२४ वायआर४ हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे ८ मेगाटन टीएमटी एवढा मोठा विस्फोट होऊ शकतो. तो हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा ५०० पट अधिक शक्तिशाली असेल.
२०२४ वायआर४ हा लघुग्रह डिसेंबर २०२४ मधये पहिल्यांदा शोधण्यात आला होता. मात्र पृथ्वीवरील जीवनासाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांच्या यादीत वरच्या स्थानी पोहोचला आहे. सध्या पृथ्वीला धोका असलेल्या लघुग्रहांच्या यादीत २०२४ वायआर४ हा पृथ्वीवर आदळण्याची शक्यता एक टक्क्यांहून अधिक असलेला एकमेव लघुग्रह आहे.
हा लघुग्रह ज्या भागात कोसळू शकतो अशा मार्गामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया, सुडान, नायजेरिया, व्हेनेझुएला, कोलंबिया आणि इक्वाडोरसारख्या देशांचा समावेश आहे. मात्र हा लघुग्रह जिथे कोसळेल, तिथे याचा प्रभाव हा त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असेल.