'इन्स्पेक्टर' हारलीन मानच्या फोटोंमुळे सोशल मीडिया 'क्लीन बोल्ड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 23:49 IST2017-11-22T23:32:33+5:302017-11-22T23:49:43+5:30

पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
या सुंदर तरूणीचे फोटो पाहून अनेकजण अक्षरशः क्लीन बोल्ड झाले. लोकांनी तिच्याबाबत माहिती काढायला सुरूवात केली.
अनेकांना ती पंजाब पोलिसात एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर) असल्याचं वाटलं. त्यानंतर तर लोकांनी तीचा फोटो शेअर करून स्वतःला अटक करण्याची मागणी करायला सुरूवात केली, आणि अल्पावधितच फेसबुक, ट्विटर , व्हॉट्सअॅप आदी ठिकाणी हा फोटो भलताच व्हायरल झाला.
पण या फोटोची सत्यता कळाल्यावर सगळेच हैराण झाले. कारण हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो कायनात अरोरा नावाच्या एका अभिनेत्रीचा आहे.
तिचा आगामी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'साठी ती पोलिसांच्या वेशात आहे. ग्रॅंड मस्ती आणि खट्टा-मीठा यासारख्या चित्रपटात ती झळकली आहे.फोटो व्हायरल झाल्यानंतर ती स्वतः पुढे आली आणि स्पष्टीकरण दिलं. हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं.