Adi Shankaracharya: कोण होते आद्य शंकराचार्य? ज्यांच्या मूर्तीचं केदारनाथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आज अनावरण By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 03:26 PM 2021-11-05T15:26:40+5:30 2021-11-05T15:32:40+5:30
Adi Shankaracharya: Kedarnath दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान Narendra Modi यांनी आज आद्य शंकराचार्य यांच्या १२ फुटी मूर्तीचं अनावर केलं. केदारनाथ दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आद्य शंकराचार्य यांच्या १२ फुटी मूर्तीचं अनावर केलं. आज आपण जाणून घेऊयात आदी शंकराचार्य कोण होते आणि त्यांनी हिंदू धर्माच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याविषयी.
शंकराचार्यांचा जन्म आद्य शंकराचार्य यांचा जन्म ७८८ रोजी केरळमधील एका गावात झाला होता. तर ८२० रोजी त्यांचे निधन झाले. या उण्यापूऱ्या ३२ वर्षांच्या काळात त्यांनी भरीव कार्य केले.
शंकराचार्यांनी आपल्या जीवनामध्ये दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत शेकडो धर्मसभा घेतल्या आणि वेदज्ञानाचा प्रसार केला, त्यांच्या का कार्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार कमी झाला आणि हिंदू धर्माचा प्रभाव पुन्हा वाढला.
एका कथेनुसार शंकराचार्यांच्या आई-वडिलांना अपत्य नव्हते. कठोर तपस्येनंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाली. आद्य शंकराचार्यांची आई आर्याम्बा स्वप्नामध्ये शिवशंकर प्रकट झाले आणि त्यांनी मी तुमचा पुत्र म्हणून जन्म घेईन, असा दृष्टांत दिला.
आद्य शंकराचार्यांच्या जीवनाची सुरुवात कलादी गावामधून सुरू होऊन ओमकारेश्वरपर्यंत जाते. येथेच नर्मदा किनाऱ्यावर त्यांना आपल्या गुरू गोविंद भागवतपडा यांचा सहवास लाभला. गुरू गोविंद सिंह यांनी येथे शंकराचार्यांना वेदसूत्र आणि ब्राह्मणांबाबत ज्ञान दिले होते. गुरू गोविंदसिंग यांनी शंकराचार्यांना वेदाचे ज्ञान पसरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ते वाराणसी येथे गेले.
आद्य शंकराचार्य एक कठीण प्रवास करून ते बद्रीनाथ येथे पोहोचले. येथे त्यांनी वेदाच्या अनेक सूत्रांची रचना केली. उपनिषदे रचले गेली. बद्रिनाथपासून शंकराचार्यांनी संपूर्ण देशात धर्माचे ज्ञान देण्यासाठी निघाले. त्यानंतर त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धर्मप्रसार केला.
देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून धर्मप्रसार करून शंकराचार्य केदारनाथ पोहोचले. या प्रवासादरम्यान, त्यांनी गोकर्ण, मुकांबिका, श्रृंगगिरी, कलाडी, द्वारका यासह अनेक ठिकाणचा प्रवास केला. केदारनाथ येथेच त्यांनी देह ठेवला. आज तिथेच पंतप्रधान मोदींनी आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले आहे.
आद्य शंकराचार्य यांना सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी देशाच्या चार कोपऱ्यांमध्ये चार पीठांची स्थापना केली. दक्षिणेस श्रृंगेरी (रामेश्वरम), तामिळनाडू, उत्तर - ज्योतिर्मठ (बद्रिनाथ), उत्तराखंड, गोवर्धन (जगन्नाथ पुरी), ओदिशा, पश्चिम - शारदा मठ (द्वारका), गुजरात, ही ती चार पीठे आहेत.
आद्य शंकराचार्य हे जन्मापासूनच वेगळे होते. अत्यंत कमी वयातच त्यांनी वेदांचे ज्ञान मिळवले. त्यांनी वेद-वेदांताच्या या ज्ञानाला देशाच्या चहू बाजूंना पोहोचवले. ईश्वराच्या दिव्यतेला लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी ब्रह्म सर्वज्ञ आहे किंवा स्व ब्रह्म आहे, हा सिद्धांत होता. मात्र आद्य शंकराचार्य यांनी कधीही कुठल्याही देवतेचे महत्त्व कमी केले नाही.