पुतळा, स्टेडियमनंतर आता गुजरातमध्ये उभे राहणार जगातील सर्वात उंच मंदिर By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 03:26 PM 2020-02-28T15:26:33+5:30 2020-02-28T15:46:25+5:30
गुजरातमध्ये सर्वात मोठे स्टेडियम आणि सर्वात मोठ्या पुतळ्यानंतर आता अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठा पुतळा आणि जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्याचा मान मिळवल्यानंतर आता गुजरातमध्ये अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे.
पाटिदारांची कुलदेवात असलेल्या माँ उमिया देवीचे हे मंदिर गुजरातमध्ये वैष्णौदेवी-जसपूर मार्गावर उभारण्यात येणार आहे. या मंदिराची उंची १३१ मीटर असेल. तसेच या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. तसेच या मंदिराचा भूमिपूजनाला दोन लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.
या मंदिराचा आराखडा जर्मन आणि भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी मिळून तयार केला आहे. मंदिराच्या आतील ह्युईंग गॅलरीमधून अहमदाबाद शहर दिसणार आहे. तसेच या मंदिराचा गर्भगृहाची बांधणी भारतीय संस्कृतीप्रमाणे करण्यात येईल.
मंदिरामध्ये माँ उमिया देवीची मूर्ती ५२ मीटर उंचीवर स्थापित केली जाईल. तसेच मंदिरामध्ये एक शिवलिंगाचीही स्थापना करण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम दरम्यान, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील अहमदाबाद येथे बांधून तयार झाले आहे. मोटेरा परिसरात असलेल्या या स्टेडियमचे नामकरण सरदार पटेल गुजरात स्टेडियम असे करण्यात आले आहे.
हे स्टेडियम सुमारे ६३ एकर परिसरात उभारण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील एमसीजीपेक्षा मोठ्या असलेल्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
या स्टेडियमच्या बांधणीसाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.
स्टॅचू ऑफ युनिटी जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याची उभारणीही गुजरातमध्येच झाली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे नामकरण स्टॅच्यू ऑफ युनिटी असे करण्यात आले आहे.
सरदार सरोवरात असलेल्या या पुतळ्याची उंची सुमारे १८२ मीटर एवढी आहे. हा पुतळा उभारण्यासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे बांधकाम सुमारे ४४ महिन्यांत पूर्ण झाले होते.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे नयनरम्य दृश्य