After threatening the BJP MLA, police guarded on the head of Navarveda
भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:07 PM2018-02-22T12:07:34+5:302018-02-22T12:10:23+5:30Join usJoin usNext गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात एका भाजपा आमदाराच्या गुंडगिरीमुळे एका तरूणाला पोलीस संरक्षणात लग्नाचे फेरे घ्यावे लागले. भाजपाचे विधायक अरविंद रैयाणी यांनी तरूणाकडे 10 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. खंडणीचे पैसे न दिल्यास तुझं लग्न मोडेन, अशी धमकी अरविंद रैयाणी यांनी तरुणाला दिली होती. धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने लग्नाची वरात घेऊन थेट पालिका आयुक्त अनुपम सिंह यांचे कार्यालय गाठले आणि त्यांना सारा प्रकार सांगितला. तरूणाची बाजू ऐकल्यानंतर आयुक्तांनी त्याला पोलीस सुरक्षा पुरविली. त्यानंतर या तरूणाने पोलीस संरक्षणात लग्नाचे फेरे घेतले. अरविंद रैयाणी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खंडणीचा आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे रैयाणी यांनी सांगितले. टॅग्स :भाजपाआमदारBJPMLA