अग्नि 5 मुळे चीन, पाकिस्तान आले भारताच्या रेंजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:42 IST2018-01-18T16:35:10+5:302018-01-18T16:42:39+5:30

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा 24 पटीनं सुस्साट जाणाऱ्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची पाचवी चाचणी आज यशस्वी झाली.

5 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदू शकणाऱ्या या शक्तिशाली क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानसोबतच चीनही भारताच्या टप्प्यात आला आहे.

अग्नि-5 क्षेपणास्त्र 17 मीटर उंच असून त्याचं वजन 50 टन आहे. हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रं वाहून नेऊ शकतं.

5000 ते 5,500 किमीपर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रं इंटरकॉन्टिनेन्टल बॅलास्टिक मिसाइल (ICBM) म्हणून ओळखली जातात.