Air Chief Marshal Bhadauria takes charge as new IAF chief
पदभार स्वीकारताच नव्या IAF प्रमुखांचा पाकला इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:17 PM2019-09-30T15:17:37+5:302019-09-30T15:23:47+5:30Join usJoin usNext व्हाइस चीफ एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सोमवारी भारतीय हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. हवाई दलाचे प्रमुख असलेले बी. एस. धनोआ 30 सप्टेंबरला निवृत्त झाले. त्यांच्या जागी राकेश कुमार सिंह भदौरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकरताच राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे. भारत ‘राफेल’मुळे चीन व पाकिस्तानवर भारी पडेल, असे राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी म्हटले आहे. राकेश कुमार सिंह भदौरिया याआधी 'राफेल' लढाऊ विमान खरेदी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते. भदौरिया 15 जून 1980 पासून हवाई दलाच्या सेवेत आहेत. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. टॅग्स :भारतीय हवाई दलindian air force