Alcohol truck overturns, people rush & looted liquor bottles
मद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवून लोकांनी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:03 PM2020-07-31T16:03:09+5:302020-07-31T16:22:22+5:30Join usJoin usNext सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जनतेला सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र देशात विविध ठिकाणी किरकोळ कारणांवरून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. असाच एक प्रकार आसाममध्ये घडला आहे. आसाममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मद्याची वाहतूक करणारा ट्रक पलटल्यानंतर लोकांनी सोशल डिस्टंसिग धाब्यावर बसवून मद्याच्या बाटल्या ठेवलेल्या खोक्यांच्यी पळवा पळवी केल्याचे या व्हिडीओत कैद झाले आहे. ही घटनाआसाममधील सोपोन भागात घडली आहे. येथून जात असलेला मद्याची वाहतूक करणारा ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या मद्याच्या बाटल्या भरलेले खोके इतरत्र विखुरले. मद्याचे विखुरलेले खोके पाहताच तिथे बघ्यांची गर्दी जमली आणि मिळेल तेवढ्या बाटल्या पळवण्यासाठी हुल्लडबाजी सुरू झाली. या मार्गाने प्रवास करत असलेल्या लोकांनीही येथे चाललेली पळवापळवी पाहून संधी साधून घेतली. बराचवेळ ही पळवापळी सुरू होती. अखेर लोकांनी या अपघातग्रस्त ट्रकमधील बराच माल लंपास केला. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्याशेजारी उलटलेला ट्रक आणि आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत ढकलाढकली करत लोक दारूच्या बाटल्या पळवत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मात्र तिथे काही लोक असेही होते ज्यांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. Read in Englishटॅग्स :आसामअपघातसोशल व्हायरलकोरोना वायरस बातम्याAssamAccidentSocial Viralcorona virus