Republic Day 2018 : राजपथावर बीएसएफ महिलांच्या चित्तथरारक कसरती पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:19 PM2018-01-26T13:19:48+5:302018-01-26T13:24:37+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे. या महिला जवानांना मध्य प्रदेशमधल्या ग्वालियारजवळच्या टेकनपूर येथे प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

या महिलांच्या मोटारसायकलवरच्या कसरतींनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बीएसएफच्या महिला कसरती करत असताना अनेक नेत्यांनी जागेवर उभं राहून त्यांचा सन्मान केला आहे.

त्यांच्या कसरती पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या चेह-यावरही हसू उमललं आहे. महिला जवानांच्या या चित्तथरारक कसरती पाहून सर्वांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बीएसएफच्या या 26 जवान महिलांना अथक मेहनत घेऊन तयार करण्यात आलं आहे.

बीएसएफच्या 106 महिलांच्या पथकाला सीमा भवानी असं नाव देण्यात आलं आहे. या महिलांनी 26 बुलेटवर सवारी करून कर्तब दाखवले आहेत.