Rafale Jets : शत्रूला क्षणाचाही अवधी न देता सगळं उद्ध्वस्त करू शकतं 'राफेल'; त्याच्या 'पॉवर'ला तोडच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:10 AM2020-07-28T10:10:46+5:302020-07-28T10:45:18+5:30

राफेलची चर्चा नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असते. पण याची चर्चा इतकी का होते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चीनसोबत तणाव सुरू असतानाच भारतीय सेनेला मोठी शक्ती मिळत आहे. ती शक्ती म्हणजे प्रत्येक दृष्टीने प्रभावी असलेल्या फायटर जेट राफेलची. भारतीय सेनेच्या ताफ्यात राफेलचा समावेश होणार आहे. राफेलची चर्चा नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असते. पण याची चर्चा इतकी का होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. इतर फायटर जेटपेक्षा राफेल कसे उजवे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राफेलची खासियत म्हणजे हे जेट रनवेवर शॉर्ट टेकऑफ करू शकतं आणि या लढाऊ विमानाला रनवेवर फार जास्त धावण्याची गरज नसते. एकदा हे जेट आकाशात पोहोचलं तर यावर नजर ठेवणं फार कठिण होऊन बसतं.

इतकेच नाहीतर राफेलची थ्रस्ट पावर याला दुसऱ्या लढाऊ विमानांपासून वेगळं ठरवते. हे जेट दश्मनांच्या रडारला एका क्षणात चमका देऊ शकतं. हेच कारण आहे की, लडाखच्या डोंगरावर लढण्यासाठी हे फार फायदेशीर आहे.

राफेलमध्ये चार प्रकारचे मिसाइल आहेत. हॅमर मिसाइल, स्क्लॅप मिसाइल, माइका आणि मेट्योर मिसाइल हे चारही मिसाइल फार घातक आहेत. स्क्लॅप मिसाइल आणि हॅमर मिसाइल गाइडेड मिसाइल आहेत. हे हवेतून जमिनीवर हल्ला करू शकतात.

हे दोन्ही मिसाइल फायर केल्यावरही कंट्रोल केले जाऊ शकतात. या दोन मिसाइलमध्ये फरक हा आहे की, स्क्लॅप मिसाइल ५०० किमोमीटरपर्यंत हल्ला करू शकतो तर हॅमर मिसाइल ६० ते ७० किलोमीटरपर्यंत दुश्मनांना निशाणा बनवू शकतं.

तसेच राफेलमध्ये मेट्योर आणि माइका मिसाइल लावलेले आहेत. दोन्ही मिसाइलची स्पीड ४ मॅक म्हणजे ५००० किलोमीटर प्रति तास आहे आणि ते ८० ते१५० किलोमीटरपर्यंत हवेतून हवेत मारा करू शकतात. मेट्योर मिसाइलने व्हिज्युअल रेंज बाहेर असल्यावरही दुश्मनाच्या लढाऊ विमानाला पाडलं जाऊ शकतं.

त्यासोबतच राफेलमध्ये जमिनीवर अचानक हल्ला करण्याचीही क्षमता आहे. राफेलमध्ये जॅमर लावलेले आहेत ज्यांमध्ये दुश्मनांच्या रडारला जाम करण्याची क्षमता आहे. राफेलमध्ये एक टार्गेट कॉर्डिनेटर डिवाइस लावलेलं आहे ज्याने राफेल गरूडासारखी तीक्ष्ण नजर मिळते.

दुश्मनाच्या भागात जाण्याआधी टार्गेट याच्या नजरेत असतात. हेच कारण आहे की, बॉर्डर क्रॉस करण्याआधी पायलट टार्गेटला हल्ल्यासाठी लॉक करू शकतं.

चीनच्या सेनेकडे S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आहे. पण राफेल या सिस्टीमलाही चमका देऊ शकते. राफेलमध्ये अॅडव्हान्स एअर फिल्ड आहे. हे डिवाइस S-400 ला हाय बीम फ्रिक्वेंसीच्या मदतीने चकमा देऊ शकतं. याने राफेलचं लोकेशन पकडलं जात नाही.

राफेल लडाखसारख्या भागात फार फायदेशीर आहे. राफेलचा वापर फार थंड परिसरातही केला जाऊ शकतो. हे जेट खासकरून डोंगरांमध्ये लढण्यासाठीच डिझाइन करण्यात आलं आहे आणि वेगाने रस्तेही बदलू शकतं. पापणी हलवण्याआधी ते आकाशात उंच पोहोचू शकतं आणि तेवढ्याच वेगाने गिरक्याही घेऊ शकतं.

जर राफेल हल्ल्याच्या रेंजबाबत सांगायचं तर अंबालामध्ये तैनात केल्यावर याचा फार फायदा होईल. राफेल अटॅकची जी रेंज आहे ती साधारण १७०० किलोमीटरच्या घरात असते. अंबाला ते लडाखचं अंतर साधारण ४३० किलोमीटरचं आहे. हे अंतर तुम्हाला फार जास्त वाटू शकतं, पण सुपरसॉनिक विमानासाठी हे फार कमी अंतर आहे.

याचा अर्थ हा आहे की लढाऊ विमान आणि त्यातील हत्यार या सर्कलमध्ये कुठेही दुश्मनाला मारू शकतात. या सर्कलमध्ये पूर्व लडाख, चीनने कब्जा केलेला अक्साई चीन, तिबेट, पाकिस्तान आणि पीओके आहे.