amid coronavirus outbreak captain swati rawal brought 263 stranded Indians home from Italy kkg
Coronavirus: इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांसाठी तिनं घेतली भरारी; स्वाती रावत यांची कौतुकास्पद कामगिरी By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:20 PM2020-03-24T13:20:03+5:302020-03-24T13:47:28+5:30Join usJoin usNext इटलीत महिन्याभरापासून कोरोनानं थैमान घातलंय. चीनमधून पसरलेल्या कोरोनानं सर्वाधिक बळी इटलीमध्ये गेले आहेत. इटलीत आतापर्यंत कोरोनामुळे ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. इटलीतील आरोग्य यंत्रणा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोरोनामुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून ती जवळपास कोलमडण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत भारतातील २६३ जण इटलीत अडकून पडले होते. एअर इंडियाच्या विमानानं त्यांना मायदेशी आणण्यात आलं. एअर इंडियाच्या पायलट स्वाती रावल यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. स्वाती रावल २२ कर्मचाऱ्यांसह एअर इंडियाचं विमान घेऊन रोमला गेल्या. तिथून २६३ भारतीयांसह त्या भारतात परतल्या. एका मुलाची आई असलेल्या स्वाती यांना ज्यावेळी इटलीला जाण्याबद्दल विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. स्वाती आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन कौतुक केलं. मुंबई ते न्यूयॉर्क जाणाऱ्या एअर इंडियाच्या बहुतांश विमानांमध्ये स्वाती रावत पायलट म्हणून काम करतात. या मार्गावर सेवा देणाऱ्या मोजक्या पायलट्समध्ये त्यांचा समावेश होतो. स्वाती रावल गेल्या १५ वर्षांपासून विमान उड्डाण करताहेत. भारतीय हवाई दलात काम करायचं स्वाती रावल यांचं स्वप्न होतं. मात्र काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी कमर्शियल पायलट होण्याचा निर्णय घेतला. इटलीहून २६३ भारतीयांची यशस्वी सुटका केल्यानंतर स्वाती यांचं सोशल मीडियानं तोंडभरुन कौतुक केलंय. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइटलीcorona virusItaly