Amid Omicron variant scare here is what scientists have to say about booster dose covishield
Omicron Variant Booster Dose : बुस्टरने वाढते ॲन्टिबॉडीजचे प्रमाण; ओमायक्रॉनपासून बचावाची शक्यताही अधिक By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:00 AM2021-12-13T11:00:13+5:302021-12-13T11:07:47+5:30Join usJoin usNext प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी बूस्टर कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोस (अतिरिक्त मात्रा) परिसंचारी प्रतिद्रव्याचे ( सर्क्युलिटिंग ॲन्टिबॉडीज) प्रमाण वाढते. शिवाय ओमायक्रॉन विषाणूपासून बचावाची शक्यताही वाढते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांसाठी बूस्टर डोस सर्वात सोपा उपाय आहे, असेही वैज्ञानिकांनी अधोरेखित केले आहे. ब्रिटन आरोग्य सुरक्षा संस्थेने म्हटले आहे की, ओमायक्रॉनविरुद्ध प्रभावी असलेल्या कोविशिल्ड लसीचा बुस्टर डोस आणि कोविड-१९ प्रतिबंध लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसने ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गापासून ७० ते ७५ टक्के सुरक्षा मिळते. यावर प्रतिक्रिया देताना विषाणू शास्रज्ञ आणि साथरोग शास्रज्ञांनी अधोरेखित केले की, कोणत्याही लसीच्या तिसऱ्या डोसने ॲन्टिबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात विषाणू शास्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, दोन डोसनंतर एक बूस्टर डोसने परिसंचारी ॲन्टिबाॅडीजचे प्रमाण वाढते. तसेच ओमायक्राॅन लक्षणसूचक संसर्गापासून बचावाची शक्यताही वाढते, असे दिसून आले आहे. भारतीय सार्स-कोव-२ जिनोमिक्स कन्सोर्टियाचे सल्लागार समितीचे माजी प्रमुख जमील यांनी सांगितले की, ज्यांना कोविशिल्डचा एकच डोस मिळाला आहे, त्यांनी १२-१६ आठवड्यांऐवजी ८ ते १२ आठवड्यातच दुसरा डोस दिला जावा. प्रसिद्ध विषाणू शास्रज्ञ डॉ. टी. जॅकब जॉन यांनी सांगितले की, पोलिओ, ओपीव्ही, गोवर यासारख्या लसी वगळता अन्य लसीच्या बूस्टर डोसने ॲन्टिबॉडीजचे प्रमाण वाढते. फायझर लसीच्या बुस्टर डोसने ॲन्टिबॉडीजचे प्रमाण ४० टक्के वाढते. ओमायक्रॉनच्या अज्ञात जोखीमेबाबत सतर्क व्हायचे असेल, तर जास्तीत जास्त लोकांना, विशेषत: प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांसाठी बूस्टर डोस देणे, सर्वात सोपा उपाय आहे. सोबत वृद्ध आणि रोगग्रस्त लोकांसाठीही असे करता येऊ शकते. त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले. आयसीएमआरचे विषाणूशास्र प्रगत संशोधन केंद्राचे माजी संचालक जॉन यांनी मुलांचे लसीकरण करण्यावर भर दिला. पुराव्याची वाट पाहण्यापेक्षा सुरक्षा करणे चांगले. Read in Englishटॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसOmicron Variantcorona virusCorona vaccine