... And the Indian soldiers proudly tricked Kargil
...अन् भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:40 PM2019-07-26T14:40:44+5:302019-07-26T14:47:23+5:30Join usJoin usNext भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांमधील छत्तीसचा आकडा जगजाहीर आहे. . तसेच नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया करणं यामुळे भारत-पाकमधील तणाव वाढतच चाललाय. त्याच पार्श्वभूमीवर 'पाकला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. कारगिल विजय दिवसाच्या (26 जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं वेगवेगळी आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये 1971मध्ये झालेलं दुसरं युद्धही भारतानं जिंकलं होतं. पण दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे. भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी आतापर्यंत त्यांचे सगळे कट उधळून लावलेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'. अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांना आणि त्यांच्या आडून दहशतवाद्यांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं. कारण या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असं पाकिस्तान समजत होता. युद्धात 26 जुलै 1999च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे 543 अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. टॅग्स :कारगिल विजय दिनKargil Vijay Diwas