दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गनची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 06:34 PM2017-12-20T18:34:23+5:302017-12-20T18:42:29+5:30

नवी दिल्लीत आनंद विहार येथे पर्यावरण मंत्रालय आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून धुरक विरोधी गनची चाचणी सुरु आहे.

हवाई प्रदूषण कमी करण्यासाठी या धुरक विरोधी गन आणण्यात आल्या असून यामुळे दिल्लीतील आकाश निरभ्र होईल अशी अपेक्षा आहे.

स्मॉग गन पाण्याच्या टाकीला जोडून गनमधून पाणी हवेत फवारले जाते. या पाण्यामुळे हवेतील विषारी घटक आणि प्रदूषित कण खाली बसतात.

एका अँटी स्मॉग गनची किंमत 20 लाख रुपये आहे, या गनमधून पाणी 50 मीटर उंचीपर्यंत फवारता येते.