लष्करप्रमुखांनी घेतली वीर जवानांची भेट, पाठीवर शाबासकीची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:22 PM2020-06-23T16:22:44+5:302020-06-23T16:38:37+5:30

भारत आणि चिनी सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आज लेह दौरा केला. या

या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी १४ व्या कोअर सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. यासोबतच भारत आणि चीन सैन्य अधिकाऱ्यांच्या चर्चेसंबंधीही माहिती घेतील. तत्पूर्वी लडाख सीमारेषेवरील हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची नरवणे यांनी भेट घेतली.

मंगळवारी सैन्य कमांडर्स कॉन्फरन्स संपल्यानंतर जनरल नरवणे दोन्ही ठिकाणच्या अस्थिर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लडाखला पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे, वास्तविक नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर हजारो भारतीय सैनिकांना तैनात करण्यात आलेलं असताना लष्करप्रमुखांचा हा दौरा होतोय.

सीमेवरच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि लडाख भागातील तणाव कमी करण्यासाठी सोमवारी भारतीय आणि चीनकडून कॉर्प्स कमांडर्सची मोल्दोमध्ये एक बैठक पार पडली आहे.

लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांदरम्यान उफाळलेल्या हिंसक संघर्षानंतर चुशुल-मोल्डो सीमेवर उभय देशांमध्ये वाटाघाटीची आणखी एक फेरी सुरू असतानाच सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमेलगतच्या रस्तेबांधणी प्रकल्पाचा आढावा घेतला.

चीनच्या सीमेवर आणीबाणीच्या व युद्धकाळात तातडीने लष्करी मदत पोहोचण्यासाठी रस्ते बांधकाम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी आज लडाखला भेट देत, रुग्णालयात जाऊन जखमी जवानांनी भेट घेतली. त्यावेळी, त्यांच्या धाडसाचं आणि बहादुरीचं कौतुकही लष्करप्रमुखांनी केलं.

लडाखच्या एलएसीवरील परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय सैन्याची सामारेषेवरील तयारीची पाहणी लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून करण्यात येणार आहे.