Asia's largest Tulip garden in Srinagar open to visitors
आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं! By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:45 PM2018-03-26T12:45:47+5:302018-03-26T12:45:47+5:30Join usJoin usNext जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 15 हेक्टरवर पसरलेल्या या गार्डनमध्ये ५३ प्रकारची जवळपास १० लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात उमलणार आहे. २५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत हे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. टय़ूलिपशिवाय हायसिंथ, नारसिसस, डॅफोडिल्स म्युसकुरिया व इरिस ही फुलेही तेथे आहेत. पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये ट्यूलिप गार्डन सुरू केलं होतं. ट्यूलिप गार्डनमुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास सरकारला आहे.