assam durga puja pandal designed on the theme of isro and its 50 years
इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:13 PM2019-10-04T15:13:18+5:302019-10-04T16:10:36+5:30Join usJoin usNext देशभरात नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सार्वजनिक मंडळांकडून देवीची मूर्ती आणि प्रतिमेची स्थापना करुन नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. आसामच्या गुवाहाटीमधील एका मंडळाने नवरात्रोत्सवासाठी इस्रोवर आधारीत सुंदर आणि आकर्षक सजावट केली आहे. इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात साकारण्यात आला आहे. इस्रोचा सुरुवातीपासून ते चांद्रयान-2 असा आतापर्यंतचा प्रवास हा दाखवण्यात आला आहे. भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची यावर्षी शंभरावी जयंती होती. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात अशा पद्धतीने सजावट करण्यात आल्याची माहिती मंडळातील सदस्यांनी दिली आहे. सजावटीच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची माहिती देण्यात आली आहे. तसेच चांद्रयान-2 चा ही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. चांद्रयान-2 मिशनची सुंदर सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. टॅग्स :नवरात्रीआसामइस्रोचांद्रयान-2NavratriAssamisroChandrayaan 2