Assembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:55 IST2018-12-11T15:48:28+5:302018-12-11T15:55:00+5:30

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पाहायला मिळाली. काँग्रेसच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
जयपूरमध्ये काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे कल काँग्रेसच्या बाजूनं येऊ लागले. हे कल पाहता काँग्रेस नेते जगदीश शर्मा आनंद साजरा करण्यासाठी फटाके घेऊन नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले.
राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
जयपूरमधील काँग्रेस कार्यालयाबाहेरही विजयोत्सवसाठी साजरा करण्यासाठी कार्यकर्ते फटाक्यांसहीत हजर राहिलेत.
राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हवन केले.