जगातील सगळ्यात मोठं 'अटल टनल' तयार; सप्टेंबरमध्ये PM मोदी उद्घाटन करणार, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 07:16 PM2020-08-27T19:16:03+5:302020-08-27T19:45:00+5:30

१० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.

हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव 'अटल टनल' आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.

ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनेल तयार करण्यात आलं आहे उंच टनेल आहे. या टनेलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.

या टनेलमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे.

समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.

हा बोगदा तयार करण्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे.

हा टनल तयार करण्याची सुरूवात २८ जून २०१० मध्ये करण्यात आली. घोड्याच्या नाळेच्या आकारात हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

बोगद्यात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याशिवाय गाड्यांची संख्या मोजण्यासाठीही ट्रॅफिक काऊंटीग कॅमेरा लावण्यात आला आहे.

भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.