Ayodhya ready for Ram Mandir Bhoomi Poojan; Uttar Pradesh government share beautiful photos
राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 12:24 PM2020-08-04T12:24:21+5:302020-08-04T12:29:36+5:30Join usJoin usNext देशवासिय आतुरतेने वाट पाहणारा क्षण अखेर जवळ आला.. बुधवारी राम जन्म भूमी पूजन होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या क्षणाची भव्यता किंचितशी कमी वाटत असली तरी उत्साहात कोणतीच कमतरता जाणवत नाही. या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या नगरीला सजवलं गेलं आहे. येथील रस्त्यांवर दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे, रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत, येथील भिंतीही सजवल्या गेल्या आहेत. राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झालेल्या अयोध्या नगरीचे प्रसन्न करणारे फोटो पाहूया.. अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जय्यत सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नेपाळच्या संतांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संत महात्मा मिळून १७५ जण सहभागी असणार आहेत. पद्मश्री मिळालेले फैजाबादचे मोहम्मद युनूस खान यांनाही आमंत्रण दिलं आहे. युनूस खान हे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतात, मृतदेह कोणत्याही धर्माचा असला तरी विधिवत अंत्यसंस्कार करतात.Read in Englishटॅग्स :अयोध्याराम मंदिरउत्तर प्रदेशAyodhyaRam MandirUttar Pradesh