Badrinath Temple covered in a sheet of snow due to heavy snowfall in the town
बद्रिनाथ मंदिरावर पसरली बर्फाची चादर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:38 PM2019-11-27T16:38:21+5:302019-11-27T17:03:02+5:30Join usJoin usNext महाराष्ट्रात अद्याप थंडीची लाट पसरली नाही. मात्र देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणचा पारा उतरण्यास सुरुवात झाली असून उत्तराखंडमध्ये शून्य अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानाचा पारा खाली आल्यामुळे या भागात बर्फवृष्टी झाल्याचंही पाहायला मिळत असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्य म्हणजे येथील बद्रिनाथ मंदिर आणि परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. याठिकाणी जरी बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली असली तरी यामुळे मंदिरांच्या दिशेने येणाऱ्या भाविकांचा उत्साह कायम असल्याचे दिसून येते. याचबरोबर, केदारनाथ धामच्या सभोवतालच्या उंच मैदानात सफेद बर्फाची चादर पसरलेली आहे. त्यामुळे केदारनाथ धाममध्ये थंडी वाढली आहे. टॅग्स :केदारनाथKedarnath